Add to Favourite   -A   A   A+   English  
 


प्रधान मुख्‍य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) महाराष्‍ट्र राज्‍य 


श्री.श्री भगवान 
प्रधान मुख्‍य वनसंरक्षक(वनबल प्रमुख),
महाराष्‍ट्र राज्‍य

श्री. श्रीभगवान, भा.व.से यांचा जन्म १८ आक्टोंबर १९५८ चा असुन त्यांनी पटना विद्यापीठातुन एम.एस्सी (प्राणीशास्त्र)  मध्ये पदवी प्राप्त केली.  राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा मुख्य वन्यजीव रक्षक पदाचा कार्यभार, भारतीय वनसेवेतील १९८१ च्या बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे अधिकारी श्री. श्रीभगवान यांनी दिनांक १९ ऑक्टोंबर २०१५ रोजी स्वीकारला. त्यांचे सेवाकाळात त्यांनी वनखात्याच्या जवळपास सर्व शाखांमध्ये सेवा केली आहे. जसे प्रादेशिक, वनविकास महामंडळ, तसेच भारत सरकारच्या आणि आदिवासी विभागामाध्ये सुध्दा कामे केली आहेत. त्यांनी ऑगस्ट १९८३ ते फेब्रुवारी १९८६ पर्यंत उपविभागीय वनाधिकारी म्हणून भारतीय वनसेवा (परिविक्षाधिन) पदावर कामे केली. त्यांना विभागीय व्यवस्थापन, विभागीय वनअधिकारी पेडीगुंडम विभाग, आलापल्ली या उप वनसंरक्षक दर्जाच्या पदावर पदस्थापना देण्यात आली. त्यानंतर सप्टेंबर १९८६ ते जुलै १९८९ या कालावधीत त्यांनी उप-वनसंरक्षक, गडचिरोली या पदावर काम केले. ४-८-१९८९ ते ३१-३-१९९० या कालावधीत त्यांनी केंद्र शासनाच्या प्रतिनियुक्तिवर बालाघाट येथील वनक्षेत्रपाल महाविद्यालयातील इन्स्ट्रक्टर पदावर काम केले. प्रतिनियुक्तिचा कालावधी संपल्यानंतर त्यांनी १० एप्रिल १९९० ते १८ एप्रिल १९९१ पर्यंत प्राचार्य, महाराष्ट्र फॉरेस्ट रेंजर्स चिखलदरा या पदावर काम केले. त्यांनतर त्यांनी १९.४.९१ ते २८.१२.९१  पर्यंत उपवनसंरक्षक, पश्चिम मेळघाट वनविभाग, स्थित चिखलदरा या पदावर काम केले. त्यानंतर नागपूर येथे आदिवासी विकास खात्याच्या अपर आदिवासी आयुक्त पदावर काम केले. पदोन्नती नंतर त्यंनी वनसंरक्षक (वन्यजीव), नागपूर या पदावर जुन १९९७ ते ऑक्टाबर २००२ या कालावधीत काम केले. ऑक्टोबर २००२ ते सप्टेंबर २००३ या कालावधीत त्यांची वनसंरक्षक (केंद्रीय मुल्यांकन घटक) नागपूर या पदावर पदस्थापना झाली होती. वनंसरक्षक, चंद्रपूर वनवृत्त चंद्रपूर या पदावर त्यांनी नोव्हेंबर २००६ पर्यंत कामे केली. त्यानंतर पदोन्नतीनंतर २८.११.२००६ ते २८.७.२०१० या कालावधीत मुख्य वनसंरक्षक (प्रा) ठाणे या पदावर काम केले आणि त्यानंतर वनविकास महामंडळाचे, महाव्यवस्थापन म्हणून २८.७.१० ते १८.७.११ पर्यंत कामे केली.   अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक या पदावर पदोन्नती झाल्यानंतर त्यांनी (अर्थसंकल्प, नियोजन व विकास)  या पदावर दि. १९.७.२०११ ते १९.१०.२०१५ या कालावधीत कामे केली.  पदोन्नती नंतर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा मुख्य वन्यजीव रक्षक या पदावर १९.१०.२०१५ ते ३०.४.२०१७ पर्यंत कामे केली. प्रधान मुख्‍य वनसंरक्षक (वन्‍यजीव) महाराष्‍ट्र राज्‍य


श्री.ए.के.मिश्रा
प्रधान मुख्‍य वनसंरक्षक(वन्‍यजीव),
महाराष्‍ट्र राज्‍य